गृहनिर्माण संस्थेने बिल्डरकडून कोणते कागदपत्र घ्यावेत ?

1
5483
बिल्डरकडून संस्थेला कागदपत्र हस्तांतरण
बिल्डरकडून संस्थेला कागदपत्र हस्तांतरणकरणे संबंधी

सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाली की बिल्डर विविध कागदपत्रे सोसायटीकडे सोपवणे अपेक्षित आहे  ही कागदपत्रे सोसायटीने आपल्या ताब्यात ठेवली पाहिजेत. ही कागदपत्रे अत्यंत महत्वाची आहेत आणि ती बांधकाम व्यावसायिकांकडून घेणे ही व्यवस्थापकीय समितीची जबाबदारी आहे.

खालील गोष्टी व कागदपत्र बिल्डरने सदनिका धारकांना किंवा त्यांच्या संस्थेला दिले पाहिजे

बिल्डरने सोसायटी नोंद केल्यावर उपविधीनुसार समितीला द्यावयाची कागदपत्रे

१) नोंदणी अधिकाऱ्याकडून परत मिळालेली संस्थेच्या नोंदणी अर्जाची प्रत
२) नोंदणी अधिकाऱ्याने नोंदणी केलेल्या संस्थेच्या उपविधीची प्रत
३) संस्थेच्या नोंदणीचा दाखला
४) बँकेत भरणा केलेल्या रकमांची चलने
५) दिलेल्या धनादेशांच्या (चेक्सच्या) स्थळप्रती व न वापरलेले धनादेशांचे (चेक्सचे) कोरे नमुने
६) बँकेची पासबुके
७) केलेल्या करारनाम्यांची प्रती,
८) प्रवर्तकाने तयार केलेली हिशेबांची पत्रके
९) सभासदत्वाचे अर्ज
१०) प्रवर्तकांची माहिती देणारे विवरणपत्र
११) खर्च केलेल्या रकमाची प्रमाणके(व्हाउचर्स)
१२) काही शिल्लक असल्यास ती रक्कम
१३) जागेचा आराखडा
१४) संस्थेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेचा वृत्तांत
१५) नोंदणी अधिकाऱ्याशी स्थानिक प्राधिकरणाशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या फाइल्स व
१६) प्रवर्तकाच्या ताब्यात असलेली अन्य सर्व कागदपत्रे व संस्थेची मालमत्ता.
१७) कागदपत्रे ताब्यात दिल्याचाअहवाल बनविणे.

बांधकाम परवानग्या व दाखले

  1.  अकृषिक दाखला / ULC ऑर्डर
  2.  बांधकामाचा मंजूर आराखडा
  3.  बांधकाम सुरु करण्याचा दाखला
  4.  जोता प्रमाणपत्र
  5.  भोगवटा प्रमाणपत्र
  6. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला

जमीन व बांधकाम व्यवहार संबंधी

  1. बिल्डरने जमीन खरेदी केली असल्यास खरेदीखत
  2.  बिल्डर आणि जमीन मालकानी विकसन करार केला असल्यास तो करार
  3.  जमीन मालकांनी त्यांच्या पैकी एकास कुलमुखत्यार (Power of attorney) पत्र दिले असल्यास कुलमुखत्यार
  4.  विकासकांची भागीदारी असल्यास आणि कुलमुखत्यार (Power of attorney) पत्र झाले असल्यास कुलमुखत्यार

इतर

  1.  अग्निशमन विभागाचा दाखला (NoC from Fire Department)
  2.  NoC from Electrical Inspector
  3.  Clearance to operate Elevators
  4.  Property Insurance Document (if any)
  5.  विजेच्या तारांचा आराखडा, अर्थिंग बिंदू
  6.  पाण्याच्या पाईपलाईनचा आराखडा
  7.  AMC Documents – Lift, Generator, Transformer etc.
  8.  Invoices and Warranties for all Assets – Pumps, Lift, Generator, Transformer, Pool Equipments, Gym Equipments
  9.  Maintenance Schedule for all Assets
  10.  STP Drawing & certification by Architect/Pollution Control Board
  11.  Waste Disposal system with approval from Pollution Control Board
  12.  कर्मचारी जबाबदाऱ्या व कामाचे नियोजन
  13.  सर्व प्रकारच्या कर पावत्या
  14.  Payment Record for City/Municipality Water Supply
  15.  बिल्डरने संस्था देखभाल केली त्याचे सर्व दप्तर, नोंद वह्या
  16.  मेंटेनन्स साठी सदनिका धारकांकडून बिल्डरने घेतलेल्या रक्कमेचा तपशील
वरील सर्व कागदपत्रे मिळविणे आणि त्यांची देखभाल करण्याची मुख्य जबाबदारी संस्थेची आहे. ही सर्व कागदपत्रे संस्थेच्या ताब्यात देण्याची जबाबदारी बिल्डरची आहे. समितीने ती कागदपत्रे मिळविली आहेत की नाहीत याची संस्थेच्या प्रत्येक सदस्याने पडताळणी करावी.

 

#WeRunSocieties

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here