बिल्डर तुमच्या हक्काच्या FSI वर डल्ला मारत आहेत

3
4180
fsi
Read in English
सावधान! बिल्डर तुमच्या हक्काच्या FSI वर डल्ला मारत आहेत...
पुणे महानगर पालिका क्षेत्रात लोहगाव, उत्तमनगर (शिवणे), शिवणे, मुंढवा (उर्वरित केशवनगर) , हडपसर (साडेसतरानळी), शिवणे, आंबेगाव (खुर्द), आंबेगाव (बुद्रुक), उंड्री, धायरी, बावधन हि ११ गावे समाविष्ट झाली. या भागात पूर्वीच मोठ्या प्रमाणवर बांधकाम प्रकल्प उभे राहिले आहेत. त्या बांधकाम प्रकल्पात सदनिका घेणाऱ्या सर्वांनी सावध होण्याची गरज आहे. जागता पहारा ठेवण्याची गरज आहे. त्यांच्या वाढीव FSI वर बिल्डर डल्ला मारत आहेत.
ग्रामपंचायत असताना त्या भागातील चटईक्षेत्र (FSI) (उदा. १ : ०.७५ ) कमी होता. महानगर पालिकेत समाविष्ट झाल्याने FSI (उदा. १:१ म्हणजे ०.२५ इतका ) वाढला आहे. (म्हणजेच एक हजार स्क्वेअर मीटर जमिनीवर ७५० स्क्वेअर मीटर बांधकाम केले जाऊ शकत होते. आता पुणे महानगर पालिकेत गावांचा समावेश झाल्याने मनपाच्या परवानगीने रीतसर २५०० स्क्वेअर मीटर बांधकाम करता येऊ शकणार आहे.) या वाढलेल्या FSI वर बिल्डरांचा डोळा असून अनेक बिल्डर बांधकाम आराखडा सुधारणा करण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडे अर्ज करत आहेत आणि अनेक अर्ज करण्याच्या तयारीत आहेत.
सावध व्हा! तुमच्या परवानगीशिवाय बांधकाम आराखडा सुधारणा करू नये, या आशयाचे पत्र बांधकाम मंजूर करणाऱ्या विभागाला तात्काळ द्या. तसेच बिल्डरला तशी सूचना,नोटीस द्या.
मोफा कायद्यातील तरतुदीनुसार बिल्डरला जर बांधकाम आराखड्यात बदल करायचा असेल, सुधारणा अथवा वाढ करायची असेल तर सदनिकाधारकांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. अनेक बिल्डरांनी खरेदीखत करताना त्यात अनेक अटी व शर्ती टाकलेल्या असतात, त्यात बांधकाम सुधारणेचे कलम सुद्धा टाकलेले असते. त्याआधारे बिल्डर तुमची फसवणूक करू शकतो.खरेदीखतात भविष्यातील FSI बाबत कलम टाकणे, हे बेकायदेशीरअसल्याचे निवाडे उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.वाढीव FSI वर तेथील सदनिकाधारकांचा अधिकार आहे.
सदनिकाधारक जागे झाले नाहीत तर बिल्डरांची मजा होणार आहे, कोट्यावधीच गभाड त्यांना मिळणार आहे. वाढीव FSI चा फायदा दृश्य स्वरुपात नसल्याने अनेकांना त्याबद्दल कुतूहल, आत्मीयता किंवा स्वारस्य नसल्याचे दिसत आहे, सदनिकाधारकांना त्याच्या हक्काची जाणीव करून देणे, हि माझी सामाजिक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे इतरांना जागरूक करण हि तुमची सुद्धा जबाबदारी आहे.
जर बिल्डरने तुमच्या संमतीशिवाय बांधकाम आराखडा बदलला असेल तर तुम्ही बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करू शकता. लक्षात ठेवा!  अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणार अधिक गुन्हेगार असतो.
अधिक माहितीसाठी संपर्क
युवराज (दादासाहेब) पवार,अध्यक्ष,महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसीएशन, पुणे शाखा
९८९०७१२२१७

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here