गृहनिर्माण संस्थेचं लेखापरीक्षण!

3
4632

Important dates: –   Audit Completion : 31st July, AGM : 30th September , Audit Rectification report (Form O) : within 3 months from Audit report submission

३१ जुलै पर्यंत गृहनिर्माण संस्थेचं लेखापरीक्षण (कलम ८१) करून अहवाल उपनिबंधक कार्यालयात जमा झाला पाहिजे.

३० सप्टेंबरपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा (कलम ७५) आयोजित करून सभेचे कर्तव्य पार पडले गेले पाहिजे.

वार्षिक सभेत(AGM) मुख्यत्वे वार्षिक अहवाल, शिल्लक रक्कमेचा विनियोग,उपविधी सुधारणा, निवडणूक, लेखापरीक्षा अहवाल, आधीच्या लेखापरीक्षेचा दुरुस्ती अहवाल, लेखापरीक्षक नियुक्ती अशा बाबीवर चर्चा करून ठराव संमत होतात.

गृहनिर्माण संस्थेचं लेखापरीक्षण अहवालात उघकीस आलेली नियमबाह्यता आणि दोष हे (नियम ७३नुसार ओ नमुन्यात) लेखापरीक्षण अहवालाच्या तारखेपासून ३ महिन्याच्या आत समितीने निबंधकाकडे स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच,दोष दुरुस्ती (Audit Rectification report) करण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे. वार्षिक सभेत लेखापरीक्षा दोषदुरुस्ती (कलम ८२) अहवाल सादर करण्यास कसूर केल्यास सर्व समिती सदस्यांनी कलम १४६ खालील अपराध केल्याचे मानण्यात येते आणि कलम १४७ मधील तरतुदीनुसार ५०००/- रुपये शास्तीस पात्र ठरतात.

सभासदांनो! तुमच्या समितीने अशी कसूर केल्यास किंवा लेखापरीक्षण करण्यास कसूर केल्यास त्यांना धडा शिकवा. कलम ८३ नुसार निबंधकांना 1/5 सदस्यांनी केलेल्या अर्जावरून सुद्धा चौकशी केली जाऊ शकते. व्यवस्थापकीय समितीने केलेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याचा निबंधकांचा अधिकार आहे.

लेखापरीक्षकाच्या अहवालावरून काही अफ़रातफत उघडकीस आल्यास, किंवा संस्थेचे हित धोक्यात आल्यास (कलम ८८) संबंधित जबाबदार/कसूरदार व्यक्तीकडून नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार निबंधकांना आहे. दुर्दैवाने गृहनिर्माण संस्थेचे लेखापरीक्षण एक दुर्लक्षित व्यवस्था बनली आहे.

लेखापरीक्षकाला खालील प्रकारे खूप सारे अधिकार आहेत, परंतु लेखापरीक्षक त्याचा वापर करत असतील, याबाबत शंका आहे.

१. लेखापरीक्षक लेखापरीक्षा अहवालात कोणतीही व्यक्ती किंवा लेख्यासंबंधित कोणत्याही अपराधाबद्दल व इतर कोणत्याही अपराधाबद्दल दोषी असल्याच्या निष्कर्षापर्यंत आला असेल तर लेख परीक्षण अहवाल सादर केल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आत निबंधकाकडे अहवाल सादर केला पाहिजे व निबंधकांनी परवानगी घेऊन FIR नोंदवला पाहिजे.
२. लेखापरीक्षकाला संस्थेचे सर्व कागदपत्र, नोंदवह्या, पुस्तके पाहण्याचा अधिकार आहे.
३. संबंधित व्यक्तीला बोलावण्याचा व त्याच्या कडून योग्य ती माहिती मागण्याचा अधिकार आहे.
४. सर्वसाधारण सभेची सूचना मिळण्याचा, उपस्थित राहण्याचा आणि मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे.

महत्वाचे :-
संस्थेच्या सदस्य अथवा अधिकारी अथवा कोणत्याही व्यक्तीमुळे संस्थेचा तोटा झाल्याचे लेखापरीक्षकाला त्याच्या लेखापरीक्षेचा निष्कर्षावरून वाटत असेल, तर त्याने विशेष अहवाल तयार करून निबंधकाना सादर केला पाहिजे. तसे न केल्यास लेखापरीक्षकाने त्यांच्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केली, असे मानण्यात येते, परिणामी त्याला लेखापरीक्षा नामिकेवरून काढले जाऊ शकते.

लेखापरीक्षण वेळेत का होत नाही?

१) पदाधिकारी संस्थेच्या कामाला दुय्यम स्थान देतात.
२) अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार सवडीने काम करतात.
३) पैसे वाचावेत म्ह्णून स्वतः कारकून बनतात आणि कामही पूर्ण करत नाहीत.
४) वर्षभराच्या पावत्या व जमा खर्च रक्कमेचा हिशोब ज्या त्या वेळेत करत नाहीत परिणामी कामाचा पसारा वाढतो, नंतर ते काम डोईजड होते, आणि मग ते काम नकोसे होते.

3 COMMENTS

  1. fantastic post, very informative. I’m wondering why the other experts of this sector do not notice this. You must proceed your writing. I am confident, you have a huge readers’ base already!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here