सिडको(CIDCO) मानीव अभिहस्तांतरण

4
739
राज्यात सिडकोचे(CIDCO) प्रस्त वाढत चालले आहे. सिडको कार्यक्षेत्रात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे जमिनीचे हस्तांतरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी नंतर जमिनीचे अभिहस्तांतरण करून देणे किंवा अपार्टमेंट कायद्यातील तरतुदीनुसार अपार्टमेंट विलेख करून देणे विकासकाची जबाबदारी असली तरी, अनेक ठिकाणी विकासकाने जमिनीचे अभिहस्तांतरण करून दिलेले नाही. विकासकाचे उंबरठे झिझवण्यापेक्षा अथवा ग्राहक न्यायालयात अथवा दिवाणी न्यायालयात विकासकांविरुद्ध दावा दाखल करण्यापेक्षा सिडकोच्या सहनिबंधकाकडून मानीव अभिहस्तांतरण करून घेणे वेळ आणि पैशांची बचत करण्याच्या दृष्टीने अधिक हितकारक आहे. तसेच मानीव अभिहस्तांतरण करून घेतल्यावर झालेला खर्च वसुलीसाठी ग्राहक न्यायालयात दाद मागता येते. याच आदेशाच्या आधारे बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करणे सोपे होते.  
आवश्यक कागदपत्र:

१) विहित नमुना  मधील अर्ज
२) संस्था नोंदणी प्रमाणपत्र / घोषणापत्र
३)
 करारनामा प्रत
४) सर्व सदनिकाधारकांचे सूची  विक्री झालेली नसल्यास वीजबील अथवा टॅक्स पावती
५)
 सदनिकाधारकांची यादी
६) सिडकोशी झालेला भाडेकरार
७) विकसन करारनामा, कुलमुखत्यार पत्र
८) भोगवटा दाखल अथवा स्वयंघोषणापत्र
९) बांधकाम सुरु करण्याचा दाखला
१०) नियोजित अभिहस्तांतरण दस्ताची प्रत(Deed of Assignment)
११) मानीव अभिहस्तांतरण करण्याबाबत ठराव
१२) आर्किटेक्ट प्रमाणपत्र
१३) मंजूर बांधकाम आराखडा
१४) कोर्ट फी स्टॅम्प रुपये २०००/-
१५) प्रतिज्ञापत्रAd
१६) बंधपत्र
१७)
 बिल्डरला पाठवलेले नोटीस
१८) हमीपत्र आदी कागदपत्र एकत्र करून प्रस्ताव सहनिबंधक याना सादर करावा

जमीन संस्थेच्या नावावर होण्याचे फायदे:
१) सातबारावर गृहनिर्माण संस्थेचे नाव आले कि संस्था स्थापन करण्याचा उद्देश पूर्ण होतो.
२) सदनिकेची
 विक्री करणे सोपे होते, सदनिकेवर कर्ज काढणे सुलभ होते.
३) मालमत्ता मोकळी आणि विक्रेय होते
 म्हणजेच प्रॉपर्टी क्लिअर टायटल होते. 
४) मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढणे आणि विक्री करणे सुलभ होते. 
५) वाढीव चटईक्षेत्राचा लाभ घेण्यासाठी वाढीव बांधकाम मंजूर करून अधिक बांधकाम करून आर्थिक लाभ मिळवता येत.६) टीडीआर विकत घेऊन अधिक मजल्यांचे बांधकाम करून निधी उभारतो येतो. 
७) इमारतीवर मोबाईल टॉवर किंवा जाहिरात फलक उभे करून त्यापासून लाखो रुपये निधी उभारता येतो. 
८) सदनिकेची किंमत वाढते. 
९) बिल्डरला सुधारित बांधकाम मंजूर करून घेता येत नाही.

सिडको हस्तांतरण शुल्क:

सिकडोने विकसित आणि अविकसित असे भाग पडले आहेत. अभि हस्तांतरण झाल्यावर सिडको ट्रान्सफर करून घेण्यासाठी लागणारे शुल्क सिडकोने विहित केलेले आहे. सदर सिडको ट्रान्सफर फी भरल्यावर जमिनीची मालकी संस्थेच्या नावावर होते.

अपार्टमेंटच्याबाबतीत प्रत्येक अपार्टमेंट धारकाचे नाव सातबारा/प्रॉपर्टी कार्डवर लावता येते.  डिड ऑफ अपार्टमेंट म्हणजेच खरेदीखत दस्त नोंद केल्यावर तात्काळ स्वतःचे नाव सातबारा/प्रॉपर्टी कार्डवर लावून घेतले पाहिजे.

सदनिकाधारकांची जबाबदारी काय आहे?

बांधकाम प्रकल्पातील किंवा इमारतीतील ५१ टक्के सदनिकांची विक्री झाली कि बिल्डरने ४ महिन्याच्या आत गृहनिर्माण संस्था स्थापन करून दिली पाहिजे जर बिल्डर गृहनिर्माण संस्था स्थापन करून देत नसेल तर ५१ टक्के सदनिकाधारकांनी एकत्र येऊन बिल्डरच्या सहकार्याशिवाय गृहनिर्माण स्थापन करून घेतली पाहिजे व गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यावर जर बिल्डरने ४ महिन्यांत जमिनीचे हस्तांतरण संस्थेच्या नावावर केले नाही, तर बिल्डरच्या सहकार्यांशिवाय शासनाकडून मानीव अभिहस्तांतरण (डिम कन्व्हेअन्स) करून घेऊन मग सातबारा/प्रॉपर्टी कार्डवर  संस्थेचे नाव लावून घेतले पाहिजे.

मडळी! ज्या प्रकल्पात केवळ २ ते ४ सदनिका आहेत, अशा प्रकल्पातील सदनिकाधारकांनी एकत्र येऊन कंपनी किंवा भागीदारी संस्था स्थापन करून जमीन कंपनीच्या नावावर करून घेता येते.

अपार्टमेंटच्या मानीव अभिहस्तांतरण:

अपार्टमेंटच्या बाबतीत जर एखाद्या सदनिकाधारकास बिल्डरने डिड ऑफ अपार्टमेंट करून दिले नसेल तरी वरील कार्यपद्धतीचे पालन करून सहनिबंधकाकडून मानीव डिड ऑफ अपार्टमेंट करून घेता येते.

Read the blog in English here: The ultimate guide to deemed conveyance and CIDCO

 

Disclaimer: Thank you for visiting our site. The information provided as Dear Society (“we,” “us” or “our”) on https://www.dearsociety.in (the “Site”) is for general informational purposes only. We strive to provide our readers with accurate information that helps them learn more about the topics. It is not intended as a substitute for professional advice. We do not accept responsibility for the accuracy of information sourced from an external entity or take personal/ legal responsibility for your use of this information. Thank you.

 

1. Website – https://dearsociety.in/
2. Instagram – https://instagram.com/dearsocietymh?igshid=NmE0MzVhZDY=
3. LinkedIn – https://www.linkedin.com/company/dear-societyin/
4. Facebook – https://www.facebook.com/dearsocietyMH?mibextid=ZbWKwL
5. YouTube – www.youtube.com/dearsociety/featured?sub_confirmation=1

4 COMMENTS

  1. […] सिडको(CIDCO) मानीव अभिहस्तांतरण – dearsociety. राज्यात सिडकोचे प्रस्त वाढत चालले आहे. सिडको कार्यक्षेत्रात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे जमिनीचे हस्तांतरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी नंतर जमिनीचे अभिहस्तांतरण करून देणे किंवा अपार्टमेंट कायद्यातील तरतुदीनुसार अपार्टमेंट विलेख करून देणे विकासकाची जबाबदारी असली तरी, अनेक ठिकाणी विकासकाने जमिनीचे अभिहस्तांतरण करून दिलेले नाही. […]

  2. […] सिडको(CIDCO) मानीव अभिहस्तांतरण – dearsociety. राज्यात सिडकोचे प्रस्त वाढत चालले आहे. सिडको कार्यक्षेत्रात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे जमिनीचे हस्तांतरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी नंतर जमिनीचे अभिहस्तांतरण करून देणे किंवा अपार्टमेंट कायद्यातील तरतुदीनुसार अपार्टमेंट विलेख करून देणे विकासकाची जबाबदारी असली तरी, अनेक ठिकाणी विकासकाने जमिनीचे अभिहस्तांतरण करून दिलेले नाही. विकासकाचे उंबरठे झिझवण्यापेक्षा अथवा ग्राहक न्यायालयात अथवा दिवाणी न्यायालयात विकासकांविरुद्ध दावा दाखल करण्यापेक्षा सिडकोच्या सहनिबंधकाकडून मानीव अभिहस्तांतरण करून घेणे वेळ आणि पैशांची बचत करण्याच्या दृष्टीने अधिक हितकारक आहे. […]

  3. […] सिडको(CIDCO) मानीव अभिहस्तांतरण – dearsociety. राज्यात सिडकोचे प्रस्त वाढत चालले आहे. सिडको कार्यक्षेत्रात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे जमिनीचे हस्तांतरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी नंतर जमिनीचे अभिहस्तांतरण करून देणे किंवा अपार्टमेंट कायद्यातील तरतुदीनुसार अपार्टमेंट विलेख करून देणे विकासकाची जबाबदारी असली तरी, अनेक ठिकाणी विकासकाने जमिनीचे अभिहस्तांतरण करून दिलेले नाही. […]

  4. […] सिडको(CIDCO) मानीव अभिहस्तांतरण – dearsociety. राज्यात सिडकोचे प्रस्त वाढत चालले आहे. सिडको कार्यक्षेत्रात येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे जमिनीचे हस्तांतरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी नंतर जमिनीचे अभिहस्तांतरण करून देणे किंवा अपार्टमेंट कायद्यातील तरतुदीनुसार अपार्टमेंट विलेख करून देणे विकासकाची जबाबदारी असली तरी, अनेक ठिकाणी विकासकाने जमिनीचे अभिहस्तांतरण करून दिलेले नाही. […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here